बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची बातमी

मुंबई | कोरोनाचा धोका लक्षात घेत शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोना आटोक्यात आला असताना 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. मात्र आता महाविद्यालय कधी सुरु होणार? याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुण्यातील महाविद्यालये आजपासून सुरु करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज विद्यार्थीही महाविद्यालयात उपस्थित झाले. मात्र पुण्यातील महाविद्यालयांना अधिकृत पत्र न मिळाल्यानं त्यांना महाविद्यालये सुरु करावी की नाही हा प्रश्न पडला आहे. यावरच आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात उद्या सर्व कुलगुरु संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करतील. त्यांची चर्चा झाल्यानंतर उद्या किंवा परवा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालये सुरु करण्यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण कोरोना परिस्थिीतीचा आढावा घेतल्यानंतर महाविद्यालये सुरु करण्यात येतील, असंही सामंत यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

खून का बदला खूनसे! भारतीयांनी अवघ्या 24 तासांत केला दहशतवाद्यांचा खात्मा

साउथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई; तब्बल एक वर्षानंतर केला खुलासा

“केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरले आहेत”

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More