धनंजय मुडेंचं ‘ते’ विधान उदयनराजेंनी खोटं ठरवलं!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज त्यांनी भाजपत जाणार असल्याचं जाहीर केलं. अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला.

काल(गुरूवार) उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्या बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी उदयनराजे भाजपत जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. अन् राष्ट्रवादीच्या नेते-कार्यकर्त्यांना हायसं वाटलं. 

उदयनराजे भाजपत यावेत यासाठी भाजपचे बरेच नेत्यांनी कोसशीने प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नांची पराकाष्टा केली मात्र त्याला यश आलं नाही अन् उदयनराजेंनी आपला भाजपप्रवेश फिक्स केला.

धनंजय मुंडेंनी उदयनराजे जाणार नसल्याचं स्पष्ट केलं मात्र त्यांनी आज कमळ हाती घेत असल्याचं जाहीर केल्यानं धनंजय मुंडे तोंडघशी पडले.

महत्वाच्या बातम्या-