बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी…’; मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या भेटीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण असं असं. आपण एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असंच होणार असं मला वाटतंय, हो की नाही?, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोणतरी कोणत्यातरी मजल्यावरून पडतं, कोणाच्या गाडीत काय सापडत आहे, कुठेतरी काहीतरी होतय म्हणजे कुठंतरी काहीतरी घडतंय हे सगळं सर्वांना माहिती आहे ना मग त्यामध्ये भेटून काय होणार असतं, तर काय होणार तुम्ही आम्ही एकत्र येऊया आपलं लग्न परत लावूया आणि समाजाला शांत करूया. म्हणजे काय एकतर मुस्लिमांना पुरा आणि हिंदूंना जाळा एवढंच आता बाकी राहिलं असल्याचं  उदयनराजे भोसले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More