Top News

माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

सातारा | माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे.

साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहावर ही भेट झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली, मात्र या चर्चेचा तपशील कळू शकला नाही.

रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या तिकीटावर माढ्यातून खासदार झाले आहेत. त्यांच्यात आणि राष्ट्रवादीच्या रामराजेंमध्ये वाद आहे.

दरम्यान, उदयनराजे आणि रामराजे यांचंही पटत नाही, त्यामुळे रामराजे विरोधकांच्या या भेटीची सध्या एकच चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

-…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

-हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

-रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

-आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या