Top News महाराष्ट्र सातारा

विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर उदयनराजेंनी मराठा तरूणांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडेने मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. यावर भाजप खासदार उदयनराजेंनी मराठा तरूणांना आवाहन केलं आहे.

समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन असेल. राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणं हे राष्ट्राच्या आणि समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, उदयनराजेंनी विवेक रहाडेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत रहाडे परिवारासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी असल्याचं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी”

राहुल गांधींना धक्काबुक्की करत अटक केल्यावर सुप्रिया सुळेंनी निषेध करत योगींना केला ‘हा’ सवाल

उत्तर प्रदेशमध्ये राडा; युपी पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की करत केली अटक

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या