Top News

जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला…- उदयनराजे भोसले

सातारा | मृत्यू कोणाच्या हातात नाही. जो मरणार तो मरणार आणि जो जगणार तो जगणार. प्रत्येक मृत्यू हा कोरोनामुळेच होतो, असं नाही. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंच आहे. एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला मरण नसतं, असं भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली आहे. उद्योगधंदे बंद असल्याने लोकांमध्ये उद्रेक झाला तर तो कसा थांबवणार?, असा सवाल उदयनराजेंनी केलाय. ते साताऱ्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कोरोनाबाबत आयुर्वेदिक उपचाराचा विचार शासनाने केला पाहिजे. याशिवाय गोवा राज्याप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा हॉटेल व्यवसाय सुरु झाले पाहिजेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या मुद्याबाबत तज्ज्ञांची मिटिंग का बोलावली नाही?, असा सवालदेखील उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

महत्वाच्या बातम्या-

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या