बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे म्हणतात, ‘सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना’

सातारा | राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. ही तर सुरुवात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राजकारण कुठं चाललंय, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे. ते साताऱ्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचं काय? याचाही विचार सरकारने करावा, असा उदयनराजे भोसले म्हणाले.

जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भीतीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा, असंही त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“…तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू

…तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील- अनिल परब

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More