बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्री या नात्याने माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं तुमचं कर्तव्य आहे”

सातारा | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सातारा दौऱ्यावर गेलेले दिसले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला वेड लावलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील प्रसिद्ध पात्र अण्णा नाईक (माधव अभ्यंकर) उदयनराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

अजित पवारांनी जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करावेत म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं हे मंत्री या नात्याने त्यांचे कर्तव्यच आहे, अशी उपहासात्मक टीका उदयनराजेंनी यावेळी केली. आम्ही वेळोवेळी सूचना देऊ त्या आचरणात आणण्याचं काम तुमच्यासारख्या तज्ञ लोकांचं आहे आणि तुम्ही ते कराल, असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेतील आण्णा नाईक म्हणजेच प्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मालिकेतील सर्व कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. त्यासोबतच त्यांनी अण्णा नाईक यांचा प्रसिद्ध डायलॉग ‘अण्णा नाईक असो मी’ हा त्यांच्या शैलीत बोलून दाखवला.

दरम्यान, मलाही बऱ्याच दिवसांपासून उदयनराजेंची भेट घेण्याची इच्छा असल्याचं माधव अभ्यंकर यांनी सांगितलं. उदयनराजेंनी केलेल्या टीकेवर अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मेहनत, खुप घाम गाळून जनतेचा विश्वास मिळवलाय, कोणत्याही पीआर एजन्सीमुळे नाही”

“ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही?”

कडक सॅल्यूट! पतीच्या ‘त्या’ स्वप्नपूर्तीसाठी पत्नीने केलेल्या त्यागाचं तुम्हालाही वाटेल कौतुक

नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं तोंडभरून कौतुक म्हणाले…

नितीन गडकरींनी नगर जिल्ह्यासाठी केल्या ‘या’ तीन मोठ्या घोषणा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More