Top News महाराष्ट्र सातारा

“लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?”

सातारा |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. साताऱ्यामध्ये अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यावेळी तो बोलत होते.

मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?, हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. यावेळी उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील एकाच मंचावर दिसले.

मराठा आरक्षणावरुन होणारं राजकारण थांबायला हवं. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं पाहत असल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान, दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही?, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील

भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…

रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभा

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या