बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू, असं खळबळजमक वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.

तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, अंही ते म्हणाले. तसेच पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये, असं बांसुरी स्वराज यांनी म्हटलंय.

तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले, असं प्रत्युत्तर बांसुरी स्वराज यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात एकाच दिवशी तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

‘राहुल गांधी फक्त मुलींच्याच कॉलेजला भेट देतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More