बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय- उद्धव ठाकरे

मुंबई | मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असा टोला उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. मी त्यांना फोन करून सांगितलं की पुढचे 25 ते 30 वर्ष तुम्ही आणखी ‘माजी’च राहणार आहेत, असंही राऊत म्हणाले.

उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More