बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!

कोल्हापूर |  निवडणुकीच्या प्रचाराला कोल्हापूर… खासदार निवडून आले की विजयी खासदार घेऊन कोल्हापूराच्या दर्शनाला… प्रचारसभांमधून उदाहरणं कोल्हापूरची मात्र कोल्हापूर-सांगलीला महापूर येऊन 5 दिवस झालेत तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मात्र मातोश्रीच्या बाहेर पडलेले नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लवकरच मी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं सांगितलं.  मात्र पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याची तारीख अजून ठरलेली नाही.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक पूरग्रस्त भागात मदतीसाठी पोहचतील, असं उद्धव यांनी सांगितलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे पोहचले देखील मात्र सरकारमध्ये सामिल असलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी अद्याप पूरग्रस्त भागाला भेट न दिल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. खुद्द उद्धव यांच्याच उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. अन् त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी महापूरावर आपलं मतं व्यक्त करत नावापुरती औपचारिकता पूर्ण केली.

दरम्यान, शिवसेनेने ‘जनआशीर्वाद’ यात्रा पूरपरिस्थितीमुळे स्थगित केली खरी मात्र उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरच थांबणे पसंत केले.

महत्वाच्या बातम्या-

-साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला, दिला 10 कोटींचा निधी

-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”

-काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!

-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More