‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडाच्या ठिणगीचा आता वणवा झाला आहे. शिंदे गटाचे महाविकास आघाडी सरकार सोबत असलेले नाराजीनाट्य आता चव्हाट्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर उमेदवारांची नाराजी दुर करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, शिंदे आणि शिंदे गट कोणतीच तडजोड करायला तयार नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी संवाद साधताना त्यांनी या बंडामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले. हा सर्व भाजपचा डाव असून त्यांच्यासोबत जाण्यासाठी हा दबाव टाकला गेला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, मी मोह सोडला पण जिद्द सोडली नाही असंही म्हटले.
माझ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या, तेव्हा मला पुरेसा वेळ देता आला नाही, असा खुलासा देखील उद्धव ठाकरेंनी केला. मी निधी वाटपाचे काम सातत्याने चालू ठेवलं होतं. सर्वांना महत्त्वाची खाती दिली होती. स्वत: जवळ मी साधी खाती ठेवली होती. काहींनी मला शब्द दिला होता. काहीही झाले तरी सोडून जाणार नाही, तरी ते गेले. जे गेले ते कधीच माझे नव्हते. खरी शिवसेना आता माझ्यासोबत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आता भाजप आणि शिंदे गट काय निर्णय घेणार? महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार का? शिवसेनेच्या या नाराजी नाट्याला केव्हा पुर्णविराम लागणार हे आगामी काळच ठरवेल.
थोडक्यात बातम्या –
‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी
गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर
‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत
शिंदे गटातील आणखी 5 आमदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता!
“सरकार टीकेल किंवा जाईल पण शरद पवारांबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही”
Comments are closed.