जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

मुंबई | ” पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यातील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो” अशा शब्दांत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार राज्यातील मतदारांच कौतुक केलं आहे.

निवडणुकीत हारजीत तर होतेच, जो जिंकतो त्याच अभिनंदन होतच असते, पण चार राज्यात परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांच मी अभिनंदल करतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

इव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी यापेक्षा पर्याय कोण ? या प्रश्नात न पडता नको आहेत त्यांना नाकरलं, उखडून फेकलं, पुढचं काय ते पुढं बघू हेच खरे धाडस आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान,  चार राज्यात भाजपचा पराभव झाल्यानं महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करणार की स्वबळाचा नारा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

-तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

-मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का