औरंगाबाद महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

“शरद पवारांचं पोट भरलेलं, अन् ते 10 रुपयांच्या जेवणावर टीका करतात”

उस्मानाबाद | सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात आपण 10 रूपयांत जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांचं पोट भरलेलं, अन् ते 10 रुपयांच्या जेवणावर टीका करतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शरद पवारांनी दुष्काळी भागासाठी काय केलं? चारा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. पण यापूर्वी पवारांनी हे का नाही केलं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

बाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं शरद पवार म्हणतात मग माफी का मागत नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पवारांना विचारला.

दरम्यान, शिवसेनेकडून 1 रुपयात झुणका भाकर सुरु करण्यात आली होती. त्याचं काय झालं?? आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय का स्वयंपाक करायला, असं म्हणत शरद पवारांनी 10 रुपयाच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या