महाराष्ट्र मुंबई

“भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे”

मुंबई | तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. मात्र माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्र हाच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असं त्याने सांगितलं. मात्र अजूनही बाप पैसे मोजतच बसलाय, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाही. आम्ही हे पैसे मागितले तर भाजप नेते टीका करतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्राकडून जवळपास 37 हजार कोटी रुपयांचे येणे बाकी, असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या- उद्धव ठाकरे

कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, कारण…- संजय राऊत

“छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान”

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या