पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

“बाजीप्रभूंनी रक्त सांडलं, पण तुम्ही अक्कल सांडली”

अहमदनगर |  हे बाळासाहेब थोरात म्हणाले मी बाजीप्रभू देशपांडे आहे, पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडलं? तुमची अक्कल उतू गेली आणि ती सांडली, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही, कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे काल म्हणाले आम्ही थकलो. होय तुम्ही खाऊन खाऊन थकले, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवारदेखील बेकार फिरत आहेत. सोनिया गांधींनी पवारांना हाकलून दिलं, यांच्याकडे कधी सहानुभूती नव्हती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या