बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?”

पुणे | अजूनही आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं मुखमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

18 महिन्यातच हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात. राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे मला विशेष वाटतं, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. नेत्यांचा काही दोष नसतो. प्रत्येक वेळेला टिका करायला पाहिजेच असे नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगावं. अशा वेळी संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवणं गरजेचं आहे. कार्यक्रम ऑनलाईन असता तर एवढी गर्दी झाली नसती. अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या अनुयायांनी त्यांना अडचणीत आणू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, पुण्यात सार्जनिक कार्यक्रमाला फक्त 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा असताना अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. याबद्दल अजित पवारांना याच कार्यक्रमात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळही आली. एवढंच नाही तर कार्यक्रम आयोजीत करणाऱ्यांवर कारवाई करायला सांगतो असंही ते म्हणाले. पण कार्यक्रम राष्ट्रवादीचा, अजित पवार नेते राष्ट्रवादीचे, गर्दी अजित पवारांमुळे झाली तर मग ते स्वत:वरही कारवाई करणार का, असा सवालही सोशल मीडियावर विचारला जात आहे

थोडक्यात बातम्या- 

“देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही”

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More