मोदींनंतर आता उद्धव ठाकरेही उद्या शिर्डीत; लोकसभेचं रणशिंग फुंकणार!

संग्रहित फोटो

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डीतील कार्यक्रम चर्चेत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा उद्या शिर्डीला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता शिर्डीत तर दुपारी 1 वाजता ते नगरमध्ये सभा घेणार आहेत. 

आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा घेण्याचे नियोजन आहे. 

शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची उद्धव ठाकरे उद्याच घोषणा करण्याची शक्यता आहे.

शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी मंत्री बबनराव घोलप तर नगरमधून माजी आमदार अनिल राठोड, पारनेरचे आमदार विजय औटी आणि श्रीगोंद्याचे नेते घनश्याम शेलार यांची नावं चर्चेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपवाल्यांना आता साईबाबांची झोळीदेखील कमी पडायला लागली आहे!

-अमृतसर रेल्वे अपघातामुळे देश सुन्न; आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू

-…तो शासन निर्णय ‘ऊसतोड कामगार महामंडळा’चा नव्हे तर ‘सुरक्षा योजने’चा?

-पंकजाताई, दिवस मावळला… कुठं आहे ऊसतोड कामगार महामंडळ?

-दसऱ्याच्या मुहूर्तांवर हर्षवर्धन जाधवांनी केली नव्या पक्षाची स्थापना!