बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे म्हणजे पवळा तर अजित पवार म्हणजे ढवळा, ढवळ्या शेजारी बांधला पवळा अन्…”

सातारा | राज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. गुरूवारी 27 जानेवारीला हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विविध स्तरातून विरोध करण्यात येत आहे. त्यातच आता वारकरी सांप्रदयामधील ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे.

बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राजकीय नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडतात, असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळातील मुठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारू विक्रीचा निर्णय लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे, ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

ढवळ्या शेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, अशी शेतकऱ्याची म्हण असल्याचं बंडातात्या यांनी म्हटलं आहे. तसेच पत्रकारांनी ढवळा कोण आणि पोवळा कोण असा प्रश्न केला होता. त्यावर पवळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अजित पवार, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी दारू विकण्याचा गुण लावला, त्यांनीच मंदिर खुली करायची नाहीत, असं सांगितलं, असा आरोपही बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

दरम्यान, गेली 25 वर्षे आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच आम्ही हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचं आंदोलन महाराष्ट्रात उग्र रूप घेईल, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांनी बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत. परंतू, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“2024 पर्यंत सहन करू, पण आम्ही झुकणार नाही”; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

Skin care Tips: कोरडी त्वचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

भिडे पूल होणार इतिहासजमा, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More