बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घरातून एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर…’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबई | कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री घरात बसून काम करत आहेत. राज्यावर कोरोनाचं महमारीचं संकट आलं असताना मुख्यमंत्री राज्याचा सर्व कारभार घरात बसून पाहत आहेत. अशी टीका विरोधकांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला हाणला.

कोरोना संकटाच्या काळात मी जनतेला आव्हान करत होतो की घराच्या बाहेर पडू नका. त्यावेळी मीच घराबाहेर पडणं हे मला बरोबर वाटत नाही. पण आता मी लवकरच घराबाहेर पडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लवकरच सरकार पडणार असल्याचं विरोधक अनेकदा दावा करतात. यावरही त्यांनी भाष्य केलं.

दरम्यान, आघाडी टिकण्याची काळजी तुम्ही करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची सेवा करुन त्यांचा आशीर्वाद मिळवणे यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची महत्वाची मागणी

काय सांगता! पाण्याच्या टंचाईमुळे महाराष्ट्रातील ‘या’ कुटुंबाने घरातच खोदली विहीर

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

लग्नानंतर अनैतिक प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात; आता दोघींसोबत दिवस वाटुन राहावं लागणार

दिलासादायक! कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More