Top News विधानसभा निवडणूक 2019

“महाराष्ट्राच्या जनतेचा ठाकरे परिवारावर जेवढा विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही”

मुंबई |  महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनाप्रमुखांवर आणि ठाकरे परिवारावर जेवढा विश्वास आहे तेवढा अमित शहा आणि कंपनीवर नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

जे जमतं ते मी करेन तेच मी बोलेन, जे जमणार नसेल ते मी वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणार नाही कारण मी भाजपवाला नाही आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

भाजपशी बोलायला वेळ होता पण मी बोललेलो नाही. मी बोललो नाही कारण मला खोटं ठरवणाऱ्या माणसासोबत मी बोलणार नाही, अशी आक्रमक भूमिका उद्धव यांनी घेतली आहे.

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या