Loading...

…तर मी सहन करणार नाही; उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई | सत्तेच्या खुर्चीनं भाजपला वेडं केलं आहे. पहिल्यांदा कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. ठरलं नव्हतं असं बोलणार असाल तर मी सहन करणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

मला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे, की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, 10 वेळा नाही, लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असंल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Loading...

गेल्या 5 वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकासकामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही. मात्र आम्ही भाजपसोबत असल्यानंच ते कामं करू शकले, हे आता विसरत आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे.

थोड्याच वेळापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली, असा टोला त्यांनी देवेंद्र यांना लगावला. शब्द देऊन फिरवायला मी काही भाजपचा नेता नाही, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...