मुंबई | शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा सुरु आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात याची झलक पहायला मिळाली.
विधानसभेला महाराष्ट्रात युतीची सत्ता आल्यास शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे ही गोष्ट बोलून दाखवली.
पाहिजे तर तुम्ही कार्यक्रम घ्या. मलाही बोलवा., मी पण तिकडं येऊन बोलतो. सगळं कसं समसमान पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर शिवसैनिकांनी एकच कालवा केला. त्यावर मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय, असं उद्धव म्हणाले. भाषणाच्या शेवटी हा प्रकार घडला.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत सुरु असलेल्या चर्चा बाजूला ठेवायला हव्यात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात अभिमान वाटेल, असा विजय आपण येत्या विधानसभेत मिळवायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.
पाहा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे-
महत्वाच्या बातम्या
-शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमातील उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमातील देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण
-धक्कादायक!!! रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात आढळलं शेण
-पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींच्या खोलीतील धक्कादायक प्रकार उघड
-भारतीय संघाला मोठा धक्का; जे व्हायला नको होतं तेच घडलं!
Comments are closed.