Top News

उद्धव ठाकरे यांच्या तोंडी राज ठाकरेंबद्दल आपुलकीचे शब्द

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी समन्स नोटीस बजावली आहे. यानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या नोटीसीवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस जरी आली असली तरी मला त्यातून काही निघेल असं वाटत नाही, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांतून सहीसलामत बाहेर पडतील, असा विश्वासच एकप्रकारे व्यक्त केला आहे.

आपण एक-दोन दिवस थांबायला हवं… सगळ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायला मी काही तज्ज्ञ नाही, असं म्हणत त्यांनी राजकीय स्टाईलने देखील यावर उत्तर दिलं.

दरम्यान, राज यांना नोटीस आल्यानंतर मनसेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपच्या गळाला???

“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या