Loading...

24 नोव्हेंबरला जाऊन तिथं जी मूठभर माती ठेवली, त्यामुळेच हा चमत्कार घडला असावा- उद्धव ठाकरे

मुंबई | 24 नोव्हेंबरला जाऊन जी मूठभर माती तिथे नेऊन ठेवली, त्यामुळे हा चमत्कार घडला असावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अयोध्या निकाल लागल्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यात अयोध्यातली वादग्रस्त जागी राम मंदीर बनेल. तर मशीदीसाठी 5 एकर पर्यायी जागा दिली जाईल, असा निर्णय देण्यात आला आहे. त्यावरच उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

आजच्या निकालाचा आनंद व्यक्त करत असताना मी शिवसैनिकांना सूचना दिल्या आहेत. आनंद जरूर व्यक्त करा पण तो व्यक्त करत असताना कुठंही कुणाला त्रास होईल असं वागू नका, असंही उद्धव म्हणाले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं राममंदिरासाठी मोठं योगदान आहे, म्हणून मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...