मुंबई | एकनाथ शिंदेेंनी (Eknath Shinde) बंड करत शिवसेनेतील 40 आमदार पळविले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. हे बंड झाल्यानंतर शिवसेना आता डबघाईला आलेली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आक्रमक झाले आहेत. पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत आता शिवसेनेने एक एक करत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांची हाकलपट्टी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून सोलापूर जिल्हा संपर्कपदावरुन आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने त्यांची जिल्हा संपर्कपदावरुन उचलबांगडी करत हाकलपट्टी केली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क पदावर आता अनिल कोकीळ (Anil Kokil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कोकीळ हे शिवडीचे (Shivadi) नगरसेवक आहेत. कोकीळ उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात.
आमदारांचे बंड आता आमदारांपर्यंत सिमीत न रहाता ते आता खासदारांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी हादरे बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या काही खासदारांची दिल्लीत बैठक झाली. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. त्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांना वगळून ही बैठक पार पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीला 3 खासदारांनी दांडी मारली. त्यात कल्याणचे खासदार आणि शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), वाशिमच्या खासदार भावना गवळी(Bhawana Gawali) आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांचा सामावेश आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे 11 खासदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले असल्याने शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. या सर्व गोष्टींवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.
थोडक्यात बातम्या –
श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”
भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ
Comments are closed.