बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. विरोधी पक्षाने जोपर्यंत संजय राठोड आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. भाजपने आणलेला मोठा दबावामुळे त्यांना आपल्या खुर्चीवरून पायउतार होण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणासह अनेक विषयावर आपलं मत मांडलं.

उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत प्रश्न विचारला. संजय राठोडांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पहिल्यांदा स्पष्टीकरण देताना झालेल्या गर्दीवरून त्यांच्यावर तक्रार दाखल होणार की नाही?, असा सवाल केला. यावर संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. तेथे झालेल्या गर्दीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंतीला निर्बंध लावले होते आणि नेत्यांच्या राजकीय कार्यक्रमांवर कोणतीही कारवाई नाही. याच पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांवर पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवरून विरोधकांसह नेटकऱ्यांनीही टीकेची झोड उठवली होती.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

पूजाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ विनंती

“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More