मुंबई | कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलंय.
उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
योग्यवेळी एकाएका गोष्टीतून तुमची सुटका करणार असल्याचं मी सांगितलं होतं. त्यानुसार धार्मिकस्थळं उघडी करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. ते योग्य नाही. तुम्ही गर्दी करू नका. कोरोनाचं संकट संपलेलं नाही. याचं भान ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे
“राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”
कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता- उद्धव ठाकरे
सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे
डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ