मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले- उद्धव ठाकरे

मुंबई | आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विरोधकांना चांगलंच लक्ष्य केलं.

अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं होतं. अजित पवारांच्या डोळ्यात आज पाणी येतंय, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, तेव्हा तुम्ही कुठलं पाणी दाखवलं होतं?, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

आज ईडीचं राजकारण पवार तुम्हाला सुडाचं वाटतं , मग 2000 साली महाराष्ट्राला का छळलं ?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला.

राम मंदिराबाबत कोर्टाने चांगला न्याय दिला तर आनंद आहे, नाहीतर विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा. राम मंदिरासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही वचने पाळली नाही, तर ते रामालाही पटणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

&nbsp