महाराष्ट्र मुंबई

संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाचं संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचं संकटही परतवून लावू, धैर्याने त्याचा सामाना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे.

जिथे उद्योग-धंदे सुरु झाले आहेत, त्यांनी उद्या-परवा बंद ठेवावे, वादळ ज्या भागात आहेत, त्या ठिकाणी, किनारपट्टीच्या भागात कोणीही बाहेर पडू नये, मुंबईपासून रायगड सिंधुदुर्गापर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

स्थानिक प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची आवश्यकता असेल, तर त्याची सोय केलेली आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या