महाराष्ट्र मुंबई

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

मुंबई | जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘मार्मिक’च्या हिरक महोत्सवानिमित्त त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढाई सुरू केली, तेव्हा हरण्या जिंकण्याची फिकीर केली नव्हती. हाच शिवसेनेचा विचार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

जिंकणार की हरणार याचा विचार न करता लढणार व अन्याय करणाऱ्याला ठेचणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

मी पण 60 वर्षांचा झालो आणि मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते 60 वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचं समाधान असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

‘मेक इन इंडिया’ सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ हा मंत्रही अंगीकारला पाहिजे- नरेंद्र मोदी

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल- राहुल गांधी

कोरोनाच्या मृत्यूदरात घट; गेल्या 24 तासातील ‘दिलासादायक’ आकडेवारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.