महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे

मुंबई | योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. जे मुल आजारी आहे किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते. ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या –

“अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही”

“बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु”

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

“…तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे”

अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या