Top News महाराष्ट्र मुंबई

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

मुंबई |  कोरोना संसर्ग रोगाची मंदावलेली गती लक्षात घेता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून, हे अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत मुंबईत होणार आहे.

या अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच आजच्या दिवसाच्या कामकाजात दोन्ही सभागृहांमध्ये संविधानाच्या उद्दिशिकेचं वाचन केलं जाणार आहे.

कालच्या पत्रकारपरिषदमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षभरात राज्य सरकार कसं अपयशी ठरलं, हे सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्यावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर चांगलाच पलटवार केला.

दरम्यान,  राज्यात महिलांवर होणारा अत्याचार, बलात्कार यांमुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने नुकताच कॅबिनेटमध्ये शक्ती कायदा मंजूर केला आहे. या कायद्यासह आणि काही महत्त्वाच्या विधेयकांना या अधिवेशनात मंजुरी मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दिल्लीतील चालू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत तर मग…’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

“विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला”

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या