बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पाडू नका- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना सध्या पुन्हा डोक वर काढत आहे. राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत्या आलेखाप्रमाणे वाढत चालला आहे. प्रशासनाने खबरदारी आणि हा वाढता फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी तर काहींमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधत इशारा दिला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावं. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणं अशा नियमांचे पालन करणं अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असा इशाराही ठाकरेंनी यांनी नागरिकांना दिला आहे.

गेल्या 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होतं. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणानं सुरू झालं होतं. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती आहे, असल्याची आठवणही ठाकरेंनी काढली.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सातत्याने वाढणाऱ्या या आकड्यामुळे शासन-प्रशासन कडक पावले उचलण्याची शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज  तब्बल 15 हजार 602 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पुन्हा काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ

“केवळ भाजप असा पक्ष आहे जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो”

गाण्यावर जखमी जेनेलिया, रितेश देशमूख आणि मित्रांनी केला अफलातून ‘डान्स’, पाहा व्हिडिओ

फक्त भाजप सत्तेत येऊ नये त्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More