बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यात यावरून राजकारण चालू आहे. अशातच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. त्यानंर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही. काय झाले ते सगळ्यांच्या समोरच आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला यायला लागलं. देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर भेटण्याचा योग यासाठी आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील कोणताच पक्ष या आरक्षणाच्या विरोधात नाही. विधिमंडळात एकमतानं आणि एकमुखानं आरक्षणाचा निर्णय झाला होता. त्यामुळे सगळेच मराठा समाजाच्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

झोपेत असताना काळाचा घाला! झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून दुर्दैवी मृृत्यु

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

मालदीवमध्ये कोसळलेल्या रॉकेटबाबत वॉर्नरने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ

पुण्यात मोलकरणीने तब्बल 40 लाख रूपयांच्या सोन्यावर मारला डल्ला, अशा प्रकारे पोलिसांनी पकडली चोरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More