Top News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

photo Credit- pooja chavan Facebook Account

मुंबई | महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं नाव पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी जोडलं जात आहे. ज्या मंत्र्याचं नाव जोडलं गेलं आहे तो मंत्री शिवेसेनेचाच असल्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.

या प्रकरणाबद्द्ल सखोल चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच गेले काही दिवस, महिने आपल्याला लक्षात आलं असेल की एखाद्याला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यामध्ये असंही काही होता कामा नये त्याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते चौकशीनंतर जनतेसमोर येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यासोबतच यवतमाळमध्ये बंजारा समन्वय समितीच्या बैठक पार पडली.

दरम्यान, या पार पडलेल्या बैठकीमध्ये 15 फेब्रुवारीला सेवालाल महाराज जयंतीला बंजारा समन्वय समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या