बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

मुंबई| कोरोनानं सगळ्या जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. सर्वांनी एकजूटीने या संकटाचा सामना करायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

पंतप्रधानांनी जी काही गरज पडेल ती गरज पुरविण्याचं वचन दिलेलं आहे. आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा जीवाची पर्वा न करता कोरोनाशी मुकाबला करतीय याचं मला समाधान आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

लोकल, बस या सगळ्यांची गर्दी कमी करा, दिलेल्या सुचनांचं पालन करा, लक्षण लपवू नका, घराच्या बाहेर पडू नका, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे. मी स्वत: पंतप्रधानांशी बोललेलो आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या मिळाव्यात अशी पंतप्रधानांना विनंती केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कोरोना विषाणू एक-एक पाऊल पुढं टाकत आहे. त्यामुळे आत्ताच सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. गर्दी टाळण्यासाठी कायदा करण्याची गरज येऊ नये असं ते यावेळी म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा भाजपला पाठिंबा

ऊर्जामंत्र्यांची मोफत वीज घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी?; माहिती अधिकारातून उघड

महत्वाच्या बातम्या-

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी दोन महिलांना लागण

“राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More