बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी, असं म्हटलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपस्थित भाजप नेत्यांकडे बघितलं.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात मला आता माजी मंत्री म्हणू नका एक-दोन दिवसांत काय ते कळेल, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे आता यामुळे उद्धव ठाकरेंनीही केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे- उद्धव ठाकरे

गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग होण्याचा अधिक धोका- ICMR

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More