बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

मंबई |  रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणारा देवदूत मयुर शेळके याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मयुर शेळकेला फोन करुन त्याचं कौतुक केलं आहे.

तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वांगणी रेल्वे स्थानकावर सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला.

आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द रेल्वेमंत्र्यांनीही मयूर शेळके याचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा डाव’; ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

‘हवं तर हात जोडतो, पण…’; राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती

“देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More