शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार? शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंशी गुप्त चर्चा!

मुंबई | राज्यातील सत्तेत राहायचं की नाही याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्त समोर आलंय.

उद्धव ठाकरे यांनी 10 दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी सत्तेत राहण्याबाबतच्या विषयावर चर्चा झालीय. खुद्द पवारांनीच या वृताला दुजोरा दिलाय.

दरम्यान, भेटीच्या विषयावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र या भेटीबाबत शिवसेनेकडून कोणीही बोलण्यास तयार नाहीय.