बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे.

भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं कळतंय.

युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

एक दिवस दिलासा देऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

मराठा आरक्षणसंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर 97.90 टक्क्यांवर

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांच्या आत, मृतांचा आकडाही घटला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More