Top News देश

“उद्धव ठाकरेंनी अयोध्येऐवजी मक्केला जावं”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. ते अयोध्येला जाण्यापूर्वीच राजकारण सुरु झालं आहे. भाजपने त्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली असतानाच काही साधूंनी त्यांना विरोध केला आहे.

तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव यांनी अयोध्येऐवजी मक्केला जावं असा घणाघात त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः अडवणार असल्याचं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चीला जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत रामभक्तांना धोका दिल्याचा आरोपही महंत परमहंस दास यांनी केला आहे. तसेच रामभक्तांना धोका देणाऱ्यांना रामाचे दर्शन घेण्याचा काय अधिकार? असा सवाल त्यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त लोकमतनं दिलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे 8 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा- उद्धव ठाकरे

रानू मंडलच्या नशिबी पुन्हा आले पूर्वीचेच दिवस

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांना न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?; भाजपचा सवाल

भाजप खासदाराची खासदारकी जाणार? न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज आज माफ झाले; बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या