बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर विरोधकांनी याची काळजी घ्यावी”, उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना डिवचलं

सातारा | खासदार उदयनराजेभोसले (MP Udyan Raje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे  भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांच्यातील वाद काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. दोघेही सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे.

उदयनराजे यांच्या हस्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उदयनराजेंनी 20 वर्षांपूर्वीची एक आठवण सांगत त्यांनी शिवेंद्रराजेंना खोचक टोला लगावला आहे. “श्रेयवादासाठी पुन्हा असं नुकसान होणार नाही, याची विरोधकांनी काळजी घ्यावी,” असा टोला त्यांनी शिवेंद्रराजे आणि दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना लगावला आहे.

ते यावेळी म्हणाले, 20 वर्षापूर्वीही अशाच पद्धतीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला काहींनी विरोध केला होता. तेव्हाच कण्हेर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं काम झालं असतं तर कमी पैशात ही योजना झाली असती. मात्र, विरोधामुळे काही भागातले सातारकर पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, शाहूपूरीसह 18 गावांना पाणी पुरवठा करण्याची संकल्पना उदयनराजेंनी 20 वर्षांपूर्वी मांडली होती. मात्र, दिवंगत अभयसिंह राजे भोसले यांनी विरोध केला होता. त्यानंतर उद्यनराजे यांची सत्ता गेली होती. त्यामुळे ही योजना रखडली. शिवाय त्यावेळी योजनेला केवळ 16 कोटी खर्च होता, मात्र आता तो  खर्च 42 कोटी झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

चहलच्या बायकोने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची COPY अन्…; पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

“सुप्रिया ताई, मन मोठं करा अन् अजितदादांना ‘हा’ सल्ला द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More