शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाल्यास मी सहन करणार नाही- उदयनराजे

सातारा | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दारूच्या दुकानावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले शिवेंद्रसिंहराजेंवर सुद्धा अन्याय झाल्यास मी सहन करणार नाही, ते पत्रकारांशी बोलत होते.

मंडईतल हे दारूचे दुकान निघाले पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे मी करत असलेलं काम चुकीचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मंडईतील दारूचं दुकान काढण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने आले होते. त्यामुळे साताऱ्यात तणावपुर्वक परिस्थिती निर्माण झाली होती. 

दरम्यान, या दोन्ही राजांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंदवला होता. मात्र उदयनराजेंनी त्यांच्या या भूमिकेबद्दल स्पष्ट सांगितलं आहे, की शिवेंद्रराजेंवरही अन्याय झाला तर मी सहन करणार नाही, मात्र दुकानं निघालं पाहिजे ही माझी भूमिका रास्त आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना आरामही करू देत नाहीत!

-शरद पवार आणि राज ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास; आघाडीसाठी खलबतं?

-राहुल गांधी म्हणाले, चौकीदार… लोक म्हणाले, चोर है… पाहा व्हिडिओ

-उत्तर भारतीयाला मारहाण करणाऱ्या तीन शिवसैनिकांना अटक!

-अयोध्येत राम मंदिराएेवजी मशिद बांधा; भाजप नेत्याची मागणी!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या