पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

स्वार्थासाठी एका मताने वाजपेयींचं सरकार पाडलं- उदयनराजे भोसले

सातारा |  1996 साली केवळ स्वार्थासाठी वाजपेयींचं सरकार पाडलं. त्यामुळे देशाचं हजारो कोटी रूपयांचं नुकसान झालं. ते पैसे जर आज वाचले असते तर ते पैसे देशाच्या विकासासाठी वापरता आले असते. त्याच पैशाने साताऱ्याच्या कृष्णामाईचा देखील विकास करता आला असता, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

आज भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्त साताऱ्याच्या कराडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंची स्तुती केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

एवढ्या वर्ष सरकार असूनही काँग्रेसला कलम 370 हटवता आलं नाही मात्र ते काम मोदींनी आणि शहांनी करून दाखवलं, अशी स्तुतीसुमनं उदयनराजेंनी मोदी-शहांवर उधळली.

दरम्यान, उदयनराजेंनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या