बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉल्बी वाजलीच पाहिजे, बंदी घालायची तर…- उदयनराजे भोसले

मुंबई | दोन-तीन तास डॉल्बी वाजल्याने असे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत, मग डॉल्बीवर बंदी घालून या उद्योगात गुंतवणूक करणाऱ्यांवर एवढा अन्याय का केला जातो, तुम्हाला बंदी घालायची तर ज्या गोष्टींमुळे कँसर होतो, अशा व्यवसायांवर आधी बंदी घाला, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय.

सर्वोच्च न्यायालयाने डेसिमलच्या मर्यादेनुसार डॉल्बी वाजवा असे आदेश दिल्यानंतर सर्वत्र या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे याबाबत खासदार उदयनराजेंनी आपली प्रतिक्रिया दिलीये.

डॉल्बीच्या व्यवसायात अनेक गरीबांनी गुंतवणूक केलेली असते. त्यांचाही विचार झाला पाहिजे. आज शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हुद्द्याप्रमाणे भरपूर वेतन मिळतं. लोकप्रतिनिधी सांगणारे कोण? या अँगलने कुणी बघणारे की नाहीत?, असं उदयनराजे म्हणालेत.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More