बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन वर्षांच्या कमबॅकनंतर मराठमोळ्या उमेश यादवने केली ‘ही’ झकास कामगिरी

लंडन | भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना चालू आहे. या कसोटीत मराठमोळा गोलंदाज उमेश यादवला अंंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली आहे.  उमेशने मिळालेल्या संधीचं सोनं करत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

उमेशने इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. यामध्ये महत्त्वाचा बळी होता तो म्हणजे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटची, भारताची डोकेदुखी ठरणाऱ्या रूटला उमेशने त्रिफळाचीत केलं. त्यासोबतच आणखी दोन बळी घेतले, यामध्ये डेविड मलान आणि ओवरटन यांचा समावेश आहे. या कामगिरीने उमेशने आपल्या कारकीर्दीमधील 150 बळींचा टप्पा पार केला आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने ही कामगिरी केली. 2019 मध्ये दु :खापतीमुळे उमेश यादव संघाबाहेर पडला होता.

कसोटी सामन्यांमध्ये 150 बळी घेणारा उमेश यादव हा सोळावा गोलंदाज ठरला असुन या चौथ्या कसोटी सामन्यात उमेश यादवने आतापर्यंत तीन बळी घेतले आहेत. कपील देव, श्रीनाथ, झहीर खान, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे कसोटी सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त बळी घेणारे भारतीय गोलंदाज आहेत.

दरम्यान, भारताची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू असून सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत. के. एल. राहुलने फलंदाजी केली मात्र त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. भारत 155-1 असून रोहित 68 तर पुजारा 40 धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता 57 धावांची आघाडी आहे.

थोडक्यात बातम्या- 

कौतुक हवं! जगातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ उद्योजकाचा नंबर!

शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांच्या सभेला खचाखच गर्दी, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच”

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर अजित पवारांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

‘दीपालीच्या मृत्यूनंतरही छळ सुरुच…’, चित्रा वाघ संतापल्या, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More