Top News

कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

नवी दिल्ली | देशातील जनतेला कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी  केलं आहे.

प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. हर्षवर्धन आज सकाळी गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं.

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही हर्षवर्धन यांनी केलं होतं.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या