Top News देश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

नवी दिल्ली |  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात गडकरींनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

मला काल अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि कोरोना चाचणी करून घेतली. यामध्ये माझ्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा, असं आवाहनही गडकरींनी आपल्या ट्विटमधून सर्वांना केलं आहे.

दरम्यान, भारताने  कोरोनाग्रस्तांच्या रूग्णसंख्येत आज 50 लाखांचा आकडा पार केला आहे. महत्वाचं म्हणजे अवघ्या 11 दिवसात 40 लाखांवरून 50 लाखांवर रूग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घेत आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायला हवी.

 

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

तज्ज्ञांशी संवाद सुरू असून मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू- उद्धव ठाकरे

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या